Take a fresh look at your lifestyle.

जवळेत वादग्रस्त ग्रामसभेला प्रति ग्रामसभेतुन उत्तर ….. !

नगर, : जवळे ता पारनेर येथे 2 ऑक्टोबरला झालेल्या वादग्रस्त ग्रामसभेला  गावातील ग्रामस्तांनी प्रति ग्रामसभा भरवुन  सडेतोड उत्तर  दिले. या  प्रति ग्रामसभेत  वादग्रस्त  असलेले ठराव एकमताने नामंजूर करण्यात आले. या सभेला ग्रामस्थांनी  मोठा प्रतिसाद दिला. ब्रिटीशांविरूध्द बंड पुकारून प्रति सरकार स्थापण करणारे  क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून सभेचे कामकाज चालु करण्यात आले.

गेल्या वीस वर्षांपासुन रखडलेले व्यापारी संकुलालाचे जवळेकरांचे  स्वप्न  पुर्ण होणारा बीओटी तत्वावरील  विकास आराखडा  यावेळी प्रकाशित करण्यात . गावातील  दारू विक्रेत्यांचे  पाठवलेले हद्दपारीचे प्रस्ताव  मुंजूरीसाठी पाठपुरावा करण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. ग्रामदैवत श्री धर्मनाथांच्या मंदिर जिर्णोधारासाठी  लोकवर्गणी जमा करण्याचा विषय घेण्यात आला. गावच्या गटार योजनेमुळे येथील नदीचे  होत असलेले प्रदुषण रोखण्यासाठी  सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प राबण्याला पंचायतील भाग पाडू असा ठराव घेण्यात आला.

सन २०२२ पर्यंत  सर्वांसाठी घरे या केंद्र  सरकारच्या धोरणानुसार राज्य सरकारने सन २०१८ ला  सरकारी जागेतील  रहीवाशी यांची घरे निकषात बसवुन नियमित करण्याच्या शासन निर्णयानुसार ,जवळे गावातील अशी जास्तीत जास्त घरे  कायम होण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. त्यानुसार  पुढील कारवाई न झाल्यास प्रसंगी न्यायालयात जाण्यावर यावेळी विचार विनिमय करण्यात आला.  या प्रति ग्रामसभेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. अतिषय शांततेत व शिस्तबद्ध  ही ग्रामसभा पार पडली .

पोलिसांनी या ग्रामसभेला बंदोबस्त ठेवला होता. यावेळी बबनराव सालके, रामदास सालके,गंगाधर सालके, संतोष सालके, भाऊ आढाव, रामदास घावटे ,नवनाथ सालके, गजानन सोमवंशी, नाथा रासकर , आनंदा सालके, आबा रासकर,  कैलास रासकर, लहु रासकर, संतोष पठारे , निलेश सालके, ज्ञानदेव पठारे, शेखर सोमवंशी, सोमेश्वर आढाव ,पोपट पिसाळ ,अशोक सालके, गौतम खुपटे यांनी चर्चेत सहभाग घेतला. या सभेचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Comments are closed.