Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक: अनिल देशमुख यांच्या वकिलांना CBI च्या अधिकाऱ्याला लाच दिल्याप्रकरणी अटक; लाच रूप दिली ‘ही’ महागडी वस्तू

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तपास अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या उपनिरीक्षकाला अनिल देशमुखांच्या वकिलांनी आयफोन 12 प्रो (iPhone 12 Pro)  लाच म्हणून दिला असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या फोनची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि माजी गृहमंत्र्यांचे वकील आनंद डागा यांनी देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासावर प्रभाव टाकल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी तत्कालीन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पुण्यात झाली अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांची भेट 

न्युज 18 च्या वृत्तानुसार, सीबीआयने सांगितले की, 28 जून रोजी अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात पुण्यात गेले होते. या दरम्यान, अभिषेक तिवारी यांनी अनिल देशमुखचे वकील आनंद डागा यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान आनंद डागा यांनी अभिषेक तिवारीला संपूर्ण तपासाशी संबंधित अहवाल लीक करण्याच्या बदल्यात आयफोन -12 प्रो देण्याविषयी बोलले होते.

लाच म्हणून मिळालेला फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला 

तपास अहवाल लीक झाल्यानंतर अभिषेक तिवारीला आयफोन 12 प्रो देण्यात आला, तो फोन आता सीबीआयने जप्त केला असून, आता तो फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. अभिषेक तिवारी माजी मंत्र्याच्या वकिलाकडून नियमितपणे लाच घेत असल्याचे सीबीआयला तपासादरम्यान समजले आहे.

WhatsApp द्वारे पाठवायचा तपासाशी संबंधित कागदपत्र 

सीबीआयने आरोप केला आहे की तपासादरम्यान, सूत्रांनी सांगितले की अभिषेक तिवारी यापूर्वीही आनंद डागाला अनिल देशमुख यांच्या तपासाची माहिती देत होता. अभिषेक तिवारी  तपासाशी संबंधित WhatsApp द्वारे एक्शन मेमोरँडम, सीलिंग-सीलिंग मेमोरँडम, स्टेटमेंट आणि जप्ती मेमोरँडम अशा विविध कागदपत्रांच्या प्रती आनंद डागा यांना  पाठवत होता.

अभिषेक तिवारीकडे संवेदनशील माहिती सोपवण्यात आली होती : CBI 

सीबीआयकडून असे सांगण्यात आले की अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासाशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे देण्यात आली. उपनिरीक्षक म्हणून अभिषेक तिवारी यांनी या मालमत्तेच्या संदर्भात विश्वासाचा फौजदारी भंग केला आहे. त्यामुळे त्याला ताक करण्यात आली असून पुढील करावी सुरु आहे.

Comments are closed.