अबब…अखेर तब्बल २० वर्षे चाललेले युद्ध समाप्त; शेवटच्या अमेरिकन तुकडीने देखील अफगाणिस्तान सोडले, पहा फोटो
काबूल : अमेरिकन सैन्याने सोमवारी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची शेवटची तुकडी परत बोलवल्याची घोषणा केली. तालिबान्यांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकन सैन्य निघून गेल्याने 20 वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष अखेर संपला.
सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी केली अधिकृत घोषणा
“अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची परती पूर्ण करण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांना देशातून बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या लष्करी मोहिमेच्या समाप्तीची घोषणा करण्यासाठी, मी इथे आलो आहे.” अशी घोषणा सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी केली . मॅकेन्झी म्हणाले की, काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री एक मोठे सी -17 लष्करी वाहतूक विमान अमेरिकेकडे उडाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन सैन्य मागे घेण्याकरिता 31 ऑगस्टची मुदत निश्चित केली होती
निर्वासन मोहिमेत १३ अमेरिका सैन्यांचा झाला मृत्यू
इस्लामिक स्टेट-खोरासन या आतंकवादी संघटनेने ने दोन आठवड्यांच्या निर्वासन ऑपरेशन दरम्यान काबुल विमानतळावर दोन आत्मघाती हल्ले केले. आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसह 100 हून अधिक लोक मारले गेले. यानंतर कडेकोट बंदोबस्तात अंतिम उड्डाण झाले.
तालिबान ने केली मदत
मॅकेन्झी म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये तीव्र शत्रुत्व असूनही तालिबानने निर्वासन मोहीम आणि अंतिम उड्डाणे आयोजित करण्यात खूप मदत केली.
९/११ हल्ल्याचा बदल घेण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तान मध्ये आली होती
अल-कायदाने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यानंतर तालिबानला सत्तेतून बेदखल करण्यासाठी अमेरिकन सैन्य नाटोच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानात आले होते. अमेरिकन सैन्याने 20 वर्षांचे युद्ध संपल्याची आणि अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची अधिकृत पुष्टी केल्यानंतर काबुलमध्ये जल्लोषात गोळीबाराचे आवाज ऐकण्यात आले.
Comments are closed.