नोकरी विषयक: कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि कोट्यवधी लोकांचा रोजगार सुद्धा गेला आहे. तसेच कोरोना महामारीमुळे सरकारी नोकर भरती बंद आहेत. तसेच अनेक खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली होती.
दरम्यान, एका महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जगातील अग्रण्य कंपनी Amazon लवकरच भारतात तब्बल १० लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. तसेच या वर्षी 8000 पेक्षा जास्त नोकऱ्या देणार आहे.
या क्षेत्रात होईल भरती
जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर अमेझॉन इंडिया तुम्हाला नोकरीची संधी देऊ शकते. अमेझॉन या वर्षी 8000 पदांची भरती करणार आहे. 8000 पदांसाठी उमेदवारांची थेट भरती होणार असून, याअंतर्गत देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि ऑपरेशन्स क्षेत्रात भरती होईल.
या 35 शहरांमध्ये बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, कोईम्बतूर, जयपूर, कानपूर, लुधियाना, पुणे, सुरत, नोएडा इ. चा समावेश आहे.
2025 पर्यंत 20 लाख नोकऱ्या
इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, कंपनी 2025 पर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकूण 20 लाख लोकांना नोकऱ्या देईल. यापैकी 10 लाख नोकऱ्या भारतात असतील. कंपनीच्या एचआर प्रमुख दीप्ती वर्मा यांच्या मते, कंपनीने कोरोना महामारीच्या काळातही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 3 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.
भारतातील करिअर दिवस:
दीप्ती वर्मा यांच्या मते, Amazon भारतात झपाट्याने विस्तारत आहे. तसेच Amazon कंपनीसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अनुभव किती चांगला असू शकतो, यासाठी कंपनी 16 सप्टेंबर रोजी देशात करिअर डे साजरा करत आहे. या दिवशी Amazon चे वरिष्ठ कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांच्यात आभासी संवाद (Virtual Communication) होईल.
Amazon हे ऑनलाईन क्षेत्रातील मोठे नाव आहे. अनेकांचे या कंपनीत का करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे अमेझोन च्या मेगाभरतीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
Comments are closed.