Take a fresh look at your lifestyle.

अखिल ग्राहक पंचायतचे सदस्य नोंदणी अभियान आरंभ !

परभणी :- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने परभणी जिल्ह्यात ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला शनिवारी ता 4 सप्टेंबर रोजी आरंभ झाला असून शोषणमुक्त समाज निर्माणासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करावी असे आवाहन देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डाॅ विलास मोरे यांनी केले आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत केंद्रीय कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात शनिवारी ता 4 सप्टेंबर रोजी डाॅ विलास मोरे यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 25 सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. नवनिर्वाचित सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. यावेळी देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डाॅ विलास मोरे, जिल्हा संघटक धाराजी भुसारे, सचिव डाॅ संदीप चव्हाण, के.बी. शिंदे, गुलाबराव शिंदे, शामराव रणेर, सोपान टोले, अब्दुल रहिम, जयवंत गायकवाड, सतीश जाधव, अॅड मिरा शेळगावकर, मंजुषा शेलगावकर, विजय चव्हाण, दिनेश क्षीरसागर, कृष्णा डोळस, सुधाकर चव्हाण, गजानन पारवे, ओंकार भुसारे, एकनाथ मोरे यांची उपस्थिती होती.

Comments are closed.