Take a fresh look at your lifestyle.

आकाश चोप्रा यांनी सांगितला विराट कोहली आणि जो रूट यांच्यातला मोठा फरक, ऐकून विश्वास बसणार नाही

खेळ: इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरु असलेली  5 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG Test Series ) सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. लॉर्ड्स कसोटीत भारताने रोमांचक विजय मिळवला, तर यजमानांनी लीड्स येथे तिसऱ्या कसोटीत भारताचा मोठ्या फरकाने पराभव करत मालिकेत बरोबरी केली . इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आतापर्यंत मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, तर विराट कोहली या मालिकेत फारसे काही करू शकलेला नाही. दरम्यान, भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी कोहली आणि जो रूट यांच्याविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

आकाश चोप्रा यांनी सांगितला कोहली आणि रूटमधील फरक

जो रूटने मालिकेतील तीन सामन्यांमध्ये 126.75 च्या सरासरीने 507 धावा केल्या आहेत. रूटने नाबाद 180 धावांसह तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे, तर विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये 24.80 च्या सरासरीने एक अर्धशतकासह केवळ 124 धावा केल्या आहेत.

दोन कर्णधारांमध्ये नेमका फरक काय आहे ?  असा प्रश्न विचारला असता, आकाश चोप्रा म्हणाले की, आत्मविश्वास हा मुख्य पैलू आहे, जो खेळाडूंच्या कामगिरीमध्ये मोठी भूमिका बजावतो.

आकाश चोप्रा त्यांच्या  यूट्यूब चॅनेलवर बोलत होते. ते म्हणाले ‘दोन्ही खेळाडूंनी बनवलेल्या धावांमध्ये खूप मोठा  फरक आहे. रूटने 500 धावांचा टप्पा पार केला असून, त्याला थांबवणे भारतीय संघाला कठीण जात आहे. रूट  अजिबात थांबत नसून, आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. दुसरीकडे कोहली धावा काढण्यासाठी झगडत आहेत.’

सध्या रूट च्या कारकिर्दीतील सुवर्ण काळ 

आकाश चोप्रा पुढे म्हणाले, ‘मला वाटते तुम्ही कुठून सुरुवात करत आहात, या गोष्टीचा आत्मविश्वासावर  खूप फरक पडतो. भारतीय संघाची शेवटची कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध भारतात झाली होती. तेव्हा खेळपट्टीवर धावा काढणे खूप कठीण होते. फलंदाज म्हणून केवळ रोहित शर्माच आपली छाप सोडू शकला. ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन यांनीच  प्रत्येकी एक शतक झळकावले होते.’

त्यांनी सांगितले की, प्रत्येक महान खेळाडू त्याच्या कारकिर्दीत अशा टप्प्यातून जातो. काही वेळा खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या सुवर्णकाळातून  जात असतात तर काहीवेळा ते कठीण टप्प्यातूनही जातात . अशावेळी त्यांच्यासाठी धावा बनवणे आव्हानात्मक बनते.

सध्या विराट कोहली कठीण टप्प्यातून जात आहेत 

‘सध्या जो रूट त्याच्या घरात आहे, जसे विराट कोहली 2018 मध्ये होता. प्रत्येक महान खेळाडू, जो बराच काळ खेळतो, तेव्हा नेहमीच एका टप्प्यातून जातो ज्यावेळी त्यांना धावा काढण्यासाठी झगडावे लागते. विराट कोहली सध्या हेच करत आहे.’ असेही आकाश चोप्रा म्हणाले.

Comments are closed.