Take a fresh look at your lifestyle.

घटनात्मक दर्जा मिळावण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक अँड अविनाश भोसीकर

सेलू (डाॅ विलास मोरे) : येथील लिंगायत समाज सेवा समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंंथालयात शिक्षकवृंद व समाजभुषण यांचा गौरव सोहळा दरम्यान घटनात्मक दर्जा मिळावण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे असे मत अँड अविनाश भोसीकर यांनी सेलू येथे व्यक्त केले

यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष कॉ किर्तीकुमार बुरांडे, प्रा. संग्राम सोळंके, डॉ. माधव मोरे, डॉ.व्यंकट कुरहाडे, प्रा विलास साखरे, बबलू सातपुते, गणेशआण्णा नाईकवाडे, डॉ ऋतुराज साडेगावकर, शिवशंकर झमकडे आदींची उपस्थिती होती.

मध्ययुगात धर्म आणि वाचन साहित्याच्या रक्षणासाठी १ लाख ९६ हजार समाज बांधवांनी बलिदान दिले असून विज्ञानवादी लिंगायत समाजाचा  खरा क्रांतीकारी इतिहासा पासून लिंगायत समाज उपेक्षितच आहे. बदलत्या काळानुसार लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा घटनात्मक दर्जा मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनात्मक बांधनीची आवश्यकता आहे. असे मत अध्यक्षीय समारोप प्रसंगी श्री भोसीकर यांनी मांडले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजभुषण पुरस्कार प्राप्त रामआप्पा तोडकर, बबनअप्पा झमकडे, सतीश नावाडे, बाळासाहेब काजळे व सर्व शिक्षक  शिक्षिका वृंदाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोदअप्पा तरटे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, रूपाली साडेगावकर तर विरेश कडगे यांनी आभार मानले.

Comments are closed.