Take a fresh look at your lifestyle.

मानवत शहरासह परिसरातील शाळा,धार्मिक स्थळे,गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश

मानवत शहर आणि परिसरातील धार्मिक स्थळे शाळा आणि गर्दीची ठिकाणे 16 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गोयल यांनी घेतला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मानवत शहरात मागील आठवडयात करोना बाधीत रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असल्याने जिल्हयात करोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

त्यामूळे सद्यस्थितीत मानवत शहरात करोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी मानवत शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे, खेळाची मैदाने हि गढ़ींची ठिकाणे कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये या करीता ûआदेश दिले आहे.

मानवत शहरातील गर्दी होणारी आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे, मैदाने दि.5 ते दि. 16 ऑक्टोंबरपर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तहसिलदार तथा इंन्सीडेंट कमांडर मानवत, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. मानवत व मुख्याधिकारी, नगर परीषद मानवत जि.परभणी, यांच्यावर राहील.

तसेच मानवत शहरातील सर्व व्यावसायीक, व्यापारी, कामगार यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक राहील. या ओदशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनीसाथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

Comments are closed.