Take a fresh look at your lifestyle.

आता नॅशनल क्रश म्हणून चर्चेत येतेय आध्या आनंद…जाणून घ्या कोण आहे आध्या..?

मित्रहो पडद्यावर झळकणाऱ्या खूपशा अभिनेत्री तसेच सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या सुंदरी देखील नेटकऱ्यांच्या चर्चेत असतात. बॉलिवूड मधील अभिनेत्री आपल्या सौंदर्यातून नेहमीच सर्वाना आकर्षित करत असतात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामुळे खूपशा अभिनेत्री अनेकांच्या क्रश आहेत मात्र रश्मीका मंदाना सुद्धा नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते, तसेच तिच्या आधी प्रिया प्रकाश वोरियर ही नॅशनल क्रश म्हणून चर्चेत होती.

आता सोशल मीडियावर आणखी एक अभिनेत्री विशेष चर्चेत आली आहे. अगदी नॅशनल क्रशच्या यादीत तिची गणना केली जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे आध्या आनंद होय. आध्या हल्ली सोशल मीडियावर अनेकांना आकर्षित करत आहे. तिने आपल्या अदांचा वर्षाव करून अनेक रसिकांना वेड लावले आहे. सध्या ती “क्रश्ड” या वेबसेरीजमुळे तर जास्तच लोकांच्या नजरेत आली असून सर्वत्र गाजली आहे.

या सिरीज मध्ये तिने आध्या माथूरची भूमिका निभावली आहे. यामध्ये एक टीनेज लव्हस्टोरी आहे, जी सहज मनाला भुरळ घालते. शिवाय या सिरीज मधील तिचा अभिनय तर भलताच भाव खाऊन जातो. अनेकांनी तिच्या अभिनयाची प्रशंसा केली असून या भूमिकेमुळे ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. आध्या ही उत्कृष्ट कलाकार आहे, पण तिचे सौंदर्य सुद्धा घायाळ करणारे आहे.

आध्या ही मूळची कर्नाटकची आहे, मात्र तिचा जन्म सिंगापूर मध्ये झाला आहे. तिचे आई वडील सिंगापूर मध्ये राहतात. आध्या आता १७ वर्षाची आहे, इतक्या लहान वयात तिने आकाशाला गवसणी घातली आहे. तिने वयाच्या नवव्या वर्षीच आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. “बॉम्बे बेगम” सिरीज मध्ये तिने अभिनेत्री पूजा भटच्या मुलीची भूमिका साकारली होती. या निरागस भूमिकेला देखील रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

तसेच ती सिंगापूरच्या अनेक सिनेमात दिसली होती, आणि ती टीव्ही शो मध्ये सुद्धा झळकली होती. तसेच ती सिंगापूरच्या लॉयन मम्स, वर्ड व्हिज, स्लाईम पिट यांसारख्या शोमध्ये दिसली होती. तिच्या निरागस सौंदर्याला आणि उत्कृष्ट अभिनयाला पाहून चाहते तिला खूप पसंत करतात. तिची नेहमी अशीच प्रगती व्हावी ही सदिच्छा. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Comments are closed.