Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…मुलीसोबत अभ्यासावरून झाला वाद; मुलीने आईसोबत केले धक्कादायक कृत्य, ऐकून विश्वास बसणार नाही

ठाणे: सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे पडू नयेत, स्पर्धेत टिकून राहावी यासाठी पालक सतत प्रयत्नशील असतात. मात्र, यासाठी बर्‍याच वेळा मुलांनी अभ्यास करावा म्हणून ते सतत त्यांच्या मागे तगादा लावत असतात. त्यामुळे मुलांवर मानसिक ताण पडतो. या त्रासाला कंटाळून मुले चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. तर काही मुले इतर मार्ग वापरतात…

वैद्यकीय शिक्षण घेण्यावरून झाले भांडण, मुलीने केला आईचा खून

नवी मुंबईत अभ्यासावरून झालेल्या भांडणानंतर 15 वर्षीय मुलीने तिच्या आईचा कराटे बेल्टने गळा घोटून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की नंतर मुलीने या घटनेस अपघाती मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 जुलै रोजी नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडली. मुलगी आणि तिच्या आई यांच्यात अभ्यासावरून सतत भांडणे व्हायची. मृत महिलेची मुलीने वैद्यकीय अभ्यासक्रम घ्यावा अशी इच्छा होती परंतु मुलगी हे करण्यास नकार देत होती. अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्यातील एका दिली.

यापूर्वीही मुलीने केली होती पोलिसात तक्रार

मागच्या महिन्यात मुलीने तिच्या आईबद्दल पोलिसांकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांनाही समजावले होते. 30 जुलै रोजी त्या मुलीने आईचा पडून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना कळवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि तपास अहवालात महिलेचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान, मुलीने कबूल केले की तिच्या आईशी भांडणानंतर तिने कराटे बेल्टने आईचा गळा दाबला होता. मुलीला सोमवारी ताब्यात घेण्यात आले आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.