Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…कोरोनानंतर दुसरे संकट! ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 79 गावाला ‘झिका’ विषाणूचा धोका, आरोग्य विभागाचा इशारा

महाराष्ट्र राज्य अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावातून सावरलेले नाही, यातच आणखी एक संकट आरोग्य विभागाची झोप उडवत आहे. राज्यात आता झिका विषाणूचाही धोका वाढत चालला आहे. मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यातील बेलसर या गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, 79 गावाला झिका विषाणूच्या धोका असल्याची भीती व्यक्त केली. झिकाचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने आतापासूनच तयारीचा वेग वाढवला आहे.

झिका विषाणूचा पहिला रुग्ण पुण्याच्या बेलसर गावात आढळला होता. झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर पुण्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर सर्व ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, पुण्याच्या 79 गावांमध्ये झिका विषाणू पसरण्याचा धोका अधिक आहे. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील त्या गावांची यादी जाहीर केली, जिथे गेल्या अनेक वर्षांपासून झिका, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार झपाट्याने वाढत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची यादी पाहिल्यानंतर पुण्यातील 79 गावे झिकासाठी असुरक्षित मानली जात आहेत. ही गावे संवेदनशील घोषित झाल्यानंतर, आता या गावात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा रुग्ण आढळल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील आणि झिका संसर्गाची चाचणी केली जाईल. ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

झिका विषाणू एडिस डासांमुळे पसरतो. हे डास डेंग्यू आणि चिकनगुनिया देखील पसरवतात. जर एखाद्या व्यक्तीला डेंग्यू, चिकनगुनियाची लक्षणे दिसली तर त्याच्या झिका विषाणूचीही चाचणी केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने असे सांगण्यात आले. तसेच घरात स्वच्छतेची काळजी घ्या आणि ज्या ठिकाणी डासांची पैदास होऊ शकते त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या, अशा सूचनाही केल्या.

Comments are closed.