Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो! ‘हे’ 5G फोन खरेदी करण्याची चूक करू नका; नाही तर होऊ शकते मोठे नुकसान

टेक मार्गदर्शक: सध्याच्या युगात तंत्रज्ञान फार विकसित झाले आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन काही तरी येतच राहतं, किंबहुना आज जे तंत्रज्ञान नवं आहे, ते उद्या लगेच जुनं होण्याची शक्यता असते. 2016 मध्ये मुकेश अंबानी यांच्या Jio ने सेल्युलर नेटवर्क क्षेत्रातील केलेल्या क्रांतीमुळे मोबाईल इंटरनेट वापराचा कायापालटच झाला.

आता Jio त्यापेक्षा मोठी क्रांती करण्याच्या तयारीत आहे. Jio लवकरच देशभरात 5G सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा 5G सपोर्ट असणारा फोन खरेदी करण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना आपला ग्राहक वर्ग वाढवण्याची मोठी संधी मिळाली असून, या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी ग्राहकांना स्वस्तात 5G फोन उपलब्ध करून दिले आहेत.

सध्या बाजारात अनेक 5G Ready फोन आहेत, म्हणजे जेव्हा 5G सेवा उपलब्ध होईल तेव्हा युजर्सना 5G सेवा वापरता येईल. मात्र 5G सेवा वापरण्यासाठी स्मार्टफोन मध्ये कोणते फीचर्स असणे आवश्यक आहेत, याची पूर्ण माहिती युजर्सना नसते. बरेच जण स्वस्तात 5G फोन मिळत आहे म्हणून स्मार्टफोन खरेदी करतील पण जेव्हा 5G सेवा सुरू होईल तेंव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

तर या लेखात आपण जाणून घेऊया की, जर 5G फोन घ्यायचा आहे तर कोणते फिचर मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे.

5G सेवा वापरण्यासाठी जर तुम्ही तुमचा चांगलं 4G फोन सोडून नवीन 5G फोन विकत घेत असला तर सावधान, नवीन फोन घेण्याअगोदर त्या फोनमध्ये 5G सेवा उपलब्ध आहे कि नाही ते चेक करा. 5G रेडी असणे म्हणजे 5G नव्हे. हे लक्षात घेतलं पाहिजे.

बऱ्याच कंपन्या अगदी स्वस्त दारात 5G फोन विकत आहेत. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  त्यांनी त्यांचा फोन 5G रेडी असण्याचा दावा केला आहे. तर आपल्याला इथे लक्षात घेतले पाहिजे की , 5G रेडी म्हणजे 5G नव्हे. कारण या कंपन्या मोठ्या अक्षरात 5G रेडी तर लिहितात मात्र त्यापुढे कोणता बँड वापरला आहे ठळक लिहीत नाहीत. ते कुठे तरी मागच्या कोपऱ्यात बारीक अक्षरात लिहितात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

सिंगल आणि डुएल बँड फोन खरेदी करणे टाळा

ह्या कंपन्या स्वस्त फोनमध्ये सिंगल किंवा ड्युअल बँडच उपलब्ध करून देत आहेत. मात्र प्रत्यक्षात 5G सुरळीत वापरण्यासाठी यापेक्षा जास्त बँड्स ची गरज असते. काही महागड्या  किंवा मिडीयम बजेट फोनमध्ये 12 बँडस उपलब्ध आहेत.  जेवढे जास्त बँडस तेवढा चांगला परफॉर्मन्स आणि जेवढे कमी बँडस तेवढ्या अडचणी जास्त. त्यामुळे जास्त बँड्स असलेला फोन घ्या.

भारतात सध्या फक्त 5G च्या चाचणीला परवानगी मिळाली आहे. अजून पूर्णपणे चाचणीचे निष्कर्ष समोर आले नाहीत.  त्यामुळे सध्या स्वस्तात भेटणारे 5G  फोन नंतर जेव्हा अधिकृत रित्या 5G सुरु होईल तेव्हा हाय स्पीड बँड वर तग धरू शकणार नाहीत.

तसेच मागच्या वेळी जेव्हा जिओने 4G लाँच केले होते तेव्हा ज्यांनी नवीन मोबाईल घेतला त्यांनाच सुरुवातीला 4G वापरता येऊ शकत होती. त्यामुळे नवीन 5G फोन आताच घेण्याची इघाइ करून नका. अन्यथा 5G फोन असूनही तुम्हाला ती सेवा वापरण्यासाठी तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागू शकते.

त्यामुळे आताच स्वस्त 5G फोन विकत घ्याल तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.

Comments are closed.