Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, ‘या’ शहरात तापामुळे 5 मुलांचा मृत्यू, अनेक आजारी

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान लहान मुलांना जास्त धोका असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे विविध राज्यांचे सरकार याबाबत पूर्वतयारी करत आहेत. दरम्यान एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे.

5 मुलांचा मृत्यू अनेक मुले गंभीर

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे खळबळ उडाली आहे. येथे आतापर्यंत 5 मुलांचा तापामुळे मृत्यू झाला आहे, तर अजूनही डझनभर लोकांसह काही मुले आजारी आहेत. अगदी ग्रामीण भागातही मुलांचे  मृत्यू होत आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्ते घाणीने भरले असल्याचा आरोप आहे. सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) डॉ नीता कुलश्रेष्ठ यांनी फिरोजाबादमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तपासणी शिबीर उभारण्याचे दिले आदेश

फिरोजाबादमध्ये मुलांच्या मृत्यूमुळे लोक चिंतेत आहेत. सीएमओने स्वतः या प्रभावित भागांना भेट दिली असून, त्यांनी सांगितले की ही कोरोनाची तिसरी लाट देखील असू शकते. त्यामुळे याची पूर्ण चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  तपासणी शिबिर उभे करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत या आदेशावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.

आज सीएमओ स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि परिसराला भेट दिली, त्यानंतर त्यांनी मुलांची तपासणी करवून घेतली आणि मुलांच्या पालकांना स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन केले. काही अडचण असल्यास त्वरित वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याचे सांगितले. तेथे उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

स्वच्छतेची काळजी घेण्याचे केले आवाहन

News 18 च्या वृत्तनुसार, सीएमओने सांगितले की, सध्या संपूर्ण शहरात डेंग्यूचा उद्रेक आहे. त्याचा लहान मुलांवर अधिक परिणाम होत आहे. जर कोणत्याही मुलाला काही समस्या असेल तर आम्ही त्वरित औषध देत आहोत. शिबिर उभारणे. स्वच्छतेची व्यवस्था केली जात आहे. फिरोजाबादमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 5 लहान मुले आहेत.

लहान मुलांना जास्त लागण होत असल्यामुळे ही कोरोंनाची तिसरी लाट असू शकते असे सीएमओ यांनी शंका व्यक्त केली असून, आता त्यासाठी सर्व उपाय योजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. देशात अजूनही लहान मुलाचे कोरोंना लसीकरण सुरू झाले नसल्यामुळे पालक चिंतित आहेत. अशावेळी त्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे त्यांनी आवाहन केले. सध्या उत्तरप्रदेश मध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, नागरिक जर बेजबाबदारपणे वागले तर तिसरी लाट लवकर येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका