Take a fresh look at your lifestyle.

INDvENG: लीड्स कसोटीत झालेल्या भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवाचे ‘चार’ मुख्य कारण, जाणून घ्या सविस्तर माहिती

लीड्स: इंग्लंड मध्ये सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. लीड्स मध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कासोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ अवघ्या 278 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने हा सामना एक डाव आणि 76 धावांनी गमावला असून, तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी करताना भारतीय संघाने 2 गडी बाद 215 धावा केल्या होत्या. मात्र, खेळाच्या चौथ्या दिवशी 8 गडी केवळ 63 धावांवर गमावले. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत यांच्यासह संपूर्ण मधल्या फळीने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर नांगी टाकली. सध्या मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.

भारतीय संघाने अशा कोणत्या चुका केल्या, त्यामुळे त्यांना ह्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या लेखात भारतीय संघाच्या पराभवाची महत्वाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

अतिशय खराब फटकेबाजी– भारतीय संघाची फलंदाजी इंग्लंडपेक्षा खूपच अनुभवी आणि आकडेवारीत चांगली आहे, पण असे असूनही भारतीय संघ हरला. भारताचे अनुभवी फलंदाज लीड्समध्ये अत्यंत अपयशी ठरले. खेळपट्टी आणि परिस्थिती कठीण होती पण विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, ऋषभ पंत यांची शॉट निवड खूपच खराब होती.

अँडरसन आणि रॉबिन्सनची जोडी – इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड जरी मालिकेतून बाहेर पडला असला तरी युवा गोलंदाज ऑली रॉबिन्सनने त्याची उणीव जाणवू दिली नाही. रॉबिन्सनने दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा सारख्या दिग्गज फलंदाजांची विकेट घेतली. त्याचबरोबर भारताच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसनने अवघ्या 6 धावांत 3 बळी घेत भारताला या सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकले होते.

जो रूट : इंग्लंडचा कर्णधार जो रूट देखील भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. ज्या हेडिंग्ले खेळपट्टीवर भारतीय फलंदाज नांगी टाकत होते, त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या कर्णधाराने 121 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. रूटने मालिकेतील सलग तिसरे शतक झळकावले. त्याने या हंगामात आतापर्यंत 6 कसोटी शतके केली आहेत, त्यापैकी 4 भारताविरुद्धच बनवली आहेत. भारतीय गोलंदाजांना जो रूटल बाद करणे कठीण जात आहे.

खेळपट्टी समजून घेण्यात विराट कोहली अपयशी – या पराभवाचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, विराट कोहलीने खेळपट्टी समजण्यात केलेली चूक. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण इथे त्याने मोठी चूक केली.

पहिल्या दिवसाच्या खेळातील पहिला तास टीम इंडियावर भारी पडला. भारतीय संघाचे फलंदाज आयाराम-गयाराम बनले आणि संघ 78 धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावात 78 धावांवर बाद झाल्यानंतर कसोटी सामन्यात पुनरागमन करणे जवळजवळ अशक्यच आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका