Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…पत्नीच्या मृत्यूनंतर करत होता घराची सफाई, बंद कपाटात सापडले 3 मुलांचे मृतदेह; जाणून घ्या कुठे घडली घटना

गुन्हा: रोज दुनियेत हजारो अजब आणि धक्कादायक घटना घडत असतात. कोण-कधी-काय करेल याचा काही हिशोब राहिला नाही. बर्‍याच वेळा लोकांनी केलेलं गुन्हे उघडकीस येत नाही. मात्र, गुन्हेगार मेल्यानंतर त्याने केलेले गुन्हे उघडकीस आल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी धक्कादायक घटना फ्रांस देशातील ली मॅन्स (Le Mans) शहरात घडली आहे.

घरातील बंद कपाटात सापडले 3 मृतदेह

फ्रान्समधील ले मॅन्स शहरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीच्या घरातून तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटन उघडकीस आल्यापासुन स्थानिक लोक आश्चर्याचीक्त झाले आहेत. एकाच घरातून तीन मृतदेह (3 मृतदेह) मिळणे, तेही लहान मुलांचे, ही एक गंभीर बाब आहे आणि लोक या बातम्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा करत आहेत.

घरमालकाच्या पत्नीचा 1 ऑगस्ट रोजी कॅन्सरने झाला होता मृत्यू

फ्रान्सच्या ले मॅन्सजवळील मेझेरे येथे, एका 41 वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी कर्करोगामुळे मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीने घराची साफ सफाई करण्याचे ठरवले. घराची साफसफाई करत असताना त्याला कपाटात अशी गोष्ट दिसली, ते पाहून तो स्तब्ध झाला. घराची साफसफाई करताना त्या व्यक्तीला एका मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहून तो माणूस घाबरला आणि त्याने पोलिसांना फोन केला. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन उर्वरित घराचा शोध घेतल्यानंतर त्यांना आणखी दोन मृतदेह सापडले. हे दोन्ही मृतदेह एका पिशवीत बंद होते आणि त्यांच्यासोबत दोन चाकूही होते. ज्या मुलांचे मृतदेह सापडले आहेत त्यांचे वय पोलिसांनी अद्याप उघड केले नाही.

जोडप्याला मूल-बाळ नव्हते

डेली स्टारमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीच्या पत्नीचा कर्करोगामुळे 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याने घराचे साफ सफाई करण्याचे ठरवले होते. वृत्तानुसार, पहिला मृतदेह घराच्या गॅरेजमध्ये ठेवलेल्या कपाटात सापडला, तर उर्वरित दोन मृतदेह घराजवळील एका छोट्या खोलीत ठेवलेल्या कपाटात सापडले. या जोडप्याला मुले नव्हती परंतु पत्नीच्या पहिल्या लग्नापासून दोन मुले होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी संगितले की, सुरूवातीला आम्ही या भागातील लहान मुलांच्या हरवण्याच्या रिपोर्ट्स तपासून बघणार आहोत. बाकी कारवाई त्यानंतर सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.