Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक: तालिबान स्वतः दहशतवादी हल्ल्याचा शिकार; काबूल स्फोटात 28 तालीबानी मारल्या गेले, ‘या’ संघटनेने केला हल्ला

काबुल: अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 103 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची संख्या अजूनही वाढत आहे. दरम्यान, काबुल विमानतळाच्या स्फोटात 28 तालिबान लढाऊंचाही मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. तालिबाननेही याला दुजोरा दिला आहे असा रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात दावा करण्यात आला. अहवालात म्हटले आहे की हे सेनानी काबूल विमानतळाच्या बाहेर तैनात होते. या स्फोटांमध्ये आम्ही अमेरिकेपेक्षा जास्त लोक गमावले आहेत, असे तालिबानचे म्हणणे आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते, दहशतवादी संघटना इसिसच्या खोरासन गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी म्हटले आहे की मृतांमध्ये 13 नेवी कमांडोचा समावेश आहे, तर 15 जखमी आहेत.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने सांगितले- ‘पहिला स्फोट गुरुवारी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एबी गेटवर झाला. थोड्याच वेळात, विमानतळाजवळील बॅरन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते. तीन संशयित विमानतळाबाहेर दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते, तर तिसऱ्याने बंदूक आणली होती. हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद करण्यात आली.

एवढ्या भीषण हल्ल्यानंतरही नागरिक विमानतळावर विमानाची वाट पाहत आहेत

यूएस सेंट्रल कमांडचे जनरल मॅकेन्झी म्हणाले- ‘सध्या 5 हजार लोक काबूल विमानतळावर फ्लाइटची वाट पाहत आहेत. त्यापैकी 1 हजार अमेरिकन आहेत. 14 ऑगस्टपासून आम्ही एक लाख चार हजार नागरिकांना बाहेर काढले आहे. यापैकी 66 हजार अमेरिकेचे नागरिक आहेत आणि 37 हजार नागरिक मित्र राष्ट्रांचे आहेत.

तालिबानने पाकिस्तान दुसरे घर असल्याचे सांगितले

दरम्यान, तालिबानने पाकिस्तानशी असलेली जवळीक मान्य केली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी वाहिनी एआरवाय न्यूजशी केलेल्या संभाषणात म्हटले आहे की पाकिस्तान त्यांच्या संघटनेसाठी (तालिबान) दुसरे घर आहे. जबीउल्लाहने पुढे म्हटले, अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानशी आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी स्मबंद दृढ करायचे आहेत.

Comments are closed.