सेलू (डाॅ विलास मोरे) :- तालुक्यातील कुपटा येथील एका ग्रामसेवकास दोन हजार रुपयांची लाच स्विकारतेवेळी रंगेहात पकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
सेलू येथील एका तक्रारदाराने मोकळी जागा खरेदी केली होती. ही जागा नमुना नंबर ८ अ ला लावून देण्यासाठी कुपटा येथील ग्रामसेवक निलेश अंबादास अंभोरे हे दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. या तक्रारीवरून 21 सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सेलू परतूर रस्त्यावरील जलधारा वॉटर प्लांटजवळ सापळा लावला. त्यावेळी ग्रामसेवक निलेश अंभोरे यास तक्रार दाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्वप्नाली धुतराज, कर्मचारी हनुमंते अनिल कटारे, मुक्तार, धबडगे, जनार्धन कदम यांनी केली.
Comments are closed.