Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अक्षरशः सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाल्या…

मुंबई :

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी आता थेट शरद पवारांच्या घरावरच हल्लाबोल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आंदोलक कर्मचाऱ्यांनी आक्रमक घोषणाबाजी करत शरद पवारांच्या घरावर चप्पल फेक केलेली आहे.

त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाल्याने पोलीस व सुरक्षारक्षक यांना आंदोलकांना आवरण्यात अपयश आलं परिणामी पवारांची सुरक्षा धोक्यात आली. राज्यातील कोणतेही आंदोलन असो वा मोठी घडामोड असो, सर्वप्रथम राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला त्याची कुणकुण लागते. पण शरद पवारांच्या घरासमोरील घडलेल्या घटनेनं मात्र राज्य गुप्तचर यंत्रणेचं अपयश चव्हाट्यावर आणलं आहे.

अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे या चर्चेसाठी तयार आहेत. ‘आताच्या या क्षणाला मी चर्चेला तयार आहे, पण कर्मचारी शांततेत बसायला व चर्चेसाठी तयार नाहीत’, असे सुप्रिया सुळे सांगत होत्या.

नंतर त्या अक्षरशः हात जोडून म्हणाल्या की, एसटी कर्मचाऱ्यांशी मी बोलायला तयार आहे. दगड आणि चपला फेकून मार्ग निघणार नाही. आधी मला माझे आई वडील आणि मुलीची सुरक्षा बघू दे मग मी सगळ्यांशी चर्चा करीन.

Comments are closed.