Take a fresh look at your lifestyle.

देशात कोरोनाचा विस्फोट; मागील २४ तासांत तब्बल अडीच लाख बाधित !

मुंबई – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 2 लाख 62 हजार 22 कोरोना बाधित आढळले आहेत. तर 314 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 8 हजार 708 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशवासीयांची चिंता वाढवणारी ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत पहिल्यांदाच एका दिवसात सर्वाधिक बाधित लोक सापडले असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रातही अशीच परस्थिती पाहायला मिळत असून मागील 24 तासांत कोरोनाचे 46,406 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 36 मृत्यूची नोंद झाली असून 34,658 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसाखेर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2.51 लाख झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ओमिक्रॉनचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

देशाचा विचार केला तर आतापर्यंत एकूण 3.65 कोटी लोक कोरोना संसर्गाच्या विळख्यात आले आहेत, त्यापैकी 3.48 कोटी लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 85 हजार 349 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत 70.81 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 66.83 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1,41,737 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Comments are closed.