Take a fresh look at your lifestyle.

दगडफेक प्रकरणांनंतर गृहमंत्र्यांनी मांडले ‘हे’ 3 मुद्दे; आंदोलनकारी कर्मचाऱ्यांबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या घराबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी पवार यांचं सिल्वर ओक घराबाहेर अचानकपणे आंदोलन केलं आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी घराच्या आवारात घुसखोरी केली आहे. एवढंच काय तर त्यांनी घराच्या आवारात घुसून चप्पल फेक सुद्धा केली आहे. आता या घटनेवर प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ह्यात जे दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई करू, असे म्हणत त्यांनी पहिल्यांदा आंदोलक कर्मचाऱ्यांविषयी भाष्य केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणी भडकावू विधान करत असेल तर कायदेशीर कारवाई करू. या प्रश्नाआडून राज्यात अस्ववस्था निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहे.

आमचं intelligence laps असतील तर याबाबत चौकशी करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले आहे.

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे विविध नेते आणि वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीमुळेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आंदोलन केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

Comments are closed.