Take a fresh look at your lifestyle.

एसटी कर्मचारी आंदोलन : शरद पवारांच्या घरी ‘त्या’ जबरदस्त पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री

मुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन(ST employees protest outside Sharad Pawar house) केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली आहे. आंदोलनासाठी त्यांच्या निवासस्थानी घुसखोरी करताना मोजके कर्मचारी आणि पोलीस असल्याने आंदोलकांनी सहज एन्ट्री मिळवली. मात्र 2 तासानंतरही पोलिसांचा मोठा फौजफाटा येऊनही आंदोलनकर्त्यांना आवरणं अवघड जात आहे. तणाव वाढत चालला असल्याचे दिसताच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलही तिथे आलेले आहेत.

नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणत आंदोलकांना पांगवण्यात यश मिळवलं. या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली तसेच इतक्या मोठ्या राजकीय नेत्याच्या मुंबईतील घराबाहेर अशा प्रकारे आंदोलन होणं म्हणजे पोलीस, गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. या सर्व गोंधळानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत घटनेवर भाष्य केलं आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागलं ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. या घटनेचा लवकरच तपास केला जाईल,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Comments are closed.