Take a fresh look at your lifestyle.

आजपासून ‘या’ वयोगटातील लोकांना मिळणार लसीकरणाचा बूस्टर डोस; वाचा महत्वाची माहिती

देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना 10 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित काही राज्यांतील कोरोना संदर्भातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील.

दरम्यान कोरोना अद्याप अटोक्यात आलेला नाही. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने डोकं वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. अशामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या बूस्टर डोसची घोषणा केली आहे. देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

देशभरातील लसीकरणाचा आढावा…
गेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस देण्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

Comments are closed.